खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन.



पुणे, दि. २:- खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

 
कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी विभागातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी - ९२२५९५५९५५, अहिल्यानगर ७५८८५५६२७९ व सोलापूर- ७२१९२८६९२८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेते यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश, १९८५ मधील तरतुदीनुसार निलंबन अथवा रद्दची कारवाई करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ चे कलम ३ नुसार पोलीस केस दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेऊन कृषी सेवा केंद्र चालकाने निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती (Linking) करु नये, असेही विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांनी सूचित केले आहे.



Comments

Popular posts from this blog

करियर कौन्सिलिंग सीए विषयावर एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे मार्गदर्शन.

मोशी येथील सर्पमित्रांनी नागपंचमीच्या दिवशी दिले तब्बल बारा नाग जातीच्या सापांना जीवनदान.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत