मोशी येथील सर्पमित्रांनी नागपंचमीच्या दिवशी दिले तब्बल बारा नाग जातीच्या सापांना जीवनदान.
मोशी :- श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या दिवशी मोशी येथे लक्ष्मी चौकातील अरुण चौधरी यांच्या भंगाराच्या दुकानामध्ये नाग सापांची 11 पिल्ले व एक साडेचार फुटाचा मोठा नाग साप रेस्क्यु करण्यात आला.
या सापांना रेस्क्यु करण्यासाठी मोशी येथील सर्पमित्र ,नितीन शेलकर,प्रेम खंडारे ,नरेश बाविस्कर,अनिकेत शिंदे
हे घटनास्थळी हजर होते.
साप पकडल्यानंतर तेथील नागरिकांच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
सापां विषयी मार्गदर्शन करण्यात आले
साप दिसल्यास काय करावे ?
: शांत रहा...साप दिसल्यास घाबरु नका,शक्य असल्यास त्याला तिथून जाऊ द्या.
: सर्पमित्रांना बोलवा...जर साप घरात किंवा परिसरात आढळला तर सर्प मित्राला बोलवा
: सापाला त्रास देऊ नका...सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका
:सुरक्षित अंतर ठेवा... सापाला पकडण्याचा प्रयत्न न करता त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा.
Comments
Post a Comment