करियर कौन्सिलिंग सीए विषयावर एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे मार्गदर्शन.

 

काळेवाडी,ता.१ :- मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे 30 जुलै रोजी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे करियर कौन्सिलिंग प्रोग्राम घेण्यात आला. 


     यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चार्टर्ड अकाउंटंट ओंकार दंगले हे उपस्थित होते. वाणिज्य शाखेतील बऱ्याच विद्यार्थ्यांना सीए करण्याची भीती वाटते तर विद्यार्थ्यांमध्ये असलेली सर्व भीती सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काढून त्यांना सीए विषयी सर्व माहिती दिली. 

  यावेळी सीए चे कामकाज काय असते तसेच सीए चे रजिस्ट्रेशन प्रोसेस, सीए साठी असणारे सर्व विषय याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना केले. गरजू विद्यार्थ्यांना सीए करायचे असल्यास द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे त्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


यावेळी कॉलेजच्या प्राचार्या प्रभावती जट्टे मॅडम आणि जुनियर कॉलेज विभागाचे प्रमुख श्री सावळे सर यांनी ओंकार दंगले आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या वेळी वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनंजय जाधव सर आणि आभार प्रदर्शन प्रा.योगेश पाटील सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मोशी येथील सर्पमित्रांनी नागपंचमीच्या दिवशी दिले तब्बल बारा नाग जातीच्या सापांना जीवनदान.

अरविंद एज्युकेशनमध्ये अकाउंटमधील संधी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन