अरविंद एज्युकेशनमध्ये अकाउंटमधील संधी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अकाउंट'मध्ये करिअरच्या संधी वाढताहेत : प्रा. दीपक बोदडे
पिंपरी, या.१ : - आज विविध कंपन्या, संस्थांमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षणाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने अकाउंटंट्सची मागणी वाढत आहे. याशिवाय अकाउंट क्षेत्रात करिअरसाठी इतर भरपूर पर्यायही उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तुमची आवड, क्षमता आणि करिअरची उद्दिष्ट्ये विचारात घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रा. दीपक बोदडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'अकाउंटमधील संधी' विषयावर प्रा. बोदडे बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, नीलम पवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, प्रीती पाटील, अकाउंटंट भाग्यश्री बोदडे, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. बोदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की अकाउंट क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कॉमर्स, बँकिंग, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, मॅनेजमेंट कोर्स किंवा सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस यापैकी एखादा व्यावसायिक कोर्स करता येऊ शकतो. अकाउंटिंगमधील नोकऱ्यांमध्ये प्रवेश स्तरापासून कार्यकारी स्तरांपर्यंत वाढ होऊ शकते. अकाउंटन्सी फर्म, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अकाउंटिंग प्राध्यापकाची संधीही उपलब्ध आहे. तसेच फायनान्स मॅनेजर, फायनान्शियल कंट्रोलर्स, फायनान्शियल ॲडव्हायझर्स, फायनान्शियल डायरेक्टर्स, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आदी पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्याचा विचार केल्यास उत्तम करिअर घडू शकते, असा विश्वासही त्यांनी दिला.
या सत्रासाठी अकाउंटंट भाग्यश्री बोदडे यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी, तर आभार नीलम पवार यांनी मानले.
Comments
Post a Comment