ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान
खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे साठी संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभे राहण्याची गरज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे मत ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान पुणे : देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना मागील काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एकाच प्रवर्गात असंतोष वाढीस लागू शकतो परिणामी यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाहीत, यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी संविधानिक मार्गाने जन आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाताडॉ. विजय खरे यांनी व्यक्त केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी, येथे वतीने "साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५" ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण खोरे यांना ज्येष्ठ साहित्यि...