Posts

Showing posts from July, 2025

करियर कौन्सिलिंग सीए विषयावर एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे मार्गदर्शन.

Image
  काळेवाडी,ता.१ :- मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे 30 जुलै रोजी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे करियर कौन्सिलिंग प्रोग्राम घेण्यात आला.       यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चार्टर्ड अकाउंटंट ओंकार दंगले हे उपस्थित होते. वाणिज्य शाखेतील बऱ्याच विद्यार्थ्यांना सीए करण्याची भीती वाटते तर विद्यार्थ्यांमध्ये असलेली सर्व भीती सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काढून त्यांना सीए विषयी सर्व माहिती दिली.    यावेळी सीए चे कामकाज काय असते तसेच सीए चे रजिस्ट्रेशन प्रोसेस, सीए साठी असणारे सर्व विषय याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना केले. गरजू विद्यार्थ्यांना सीए करायचे असल्यास द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे त्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या प्रभावती जट्टे मॅडम आणि जुनियर कॉलेज विभागाचे प्रमुख श्री सावळे सर यांनी ओंकार दंगले आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या वेळी वाणिज्य ...

तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा हा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा - शंकर जगताप

Image
'तुकडा बंदी कायदा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळेल चालना', आमदार शंकर जगताप यांचे मत आमदार जगताप यांनी केले निर्णयाचे स्वागत पिंपरी-चिंचवड, ९ जुलै :- तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारी आणि शेतमालकांच्या मालमत्तेवरील बंदी हटवणारी ऐतिहासिक पावले असल्याचे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. "या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जमिनीचे विभाजन, खरेदी-विक्री, वारसा हक्काचे प्रश्न अडकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि अल्पभूधारकांचे मोठे नुकसान होत होते. कायदा रद्द झाल्यास या अडचणी दूर होऊन व्यवहार खुले होतील आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता मिळेल," असे आमदार जगताप म्हणाले. तुकडेबंदीमुळे अनेक कुटुंबांमध्ये जमिनीच्या तुकड्यांवर व्यवहार न करता आल्याने वाद, न्यायालयीन खटले, उत्पन्नात अडथळा आणि विकास योजना रेंगाळल्या होत्या. "हा कायदा रद्द होणं ही जनहिताची गरज होती आणि ती सरकारने ओळखली याचा मला आनंद आहे," अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात महसूल, नग...